भीमराया
भीमराया
अवघे विश्व व्यापिलेस तू
बुद्धिवंत ज्ञानवंत तू
अर्पिलेस अवघे जीवन
अंतरीचा प्रकाश तू।
जनमानसां चा आधार तू
न्यायाचे प्रखर तेज तू
बुरसटलेल्या समाजधुरिणांवर
ओढीलास आसूड तू ।
बुद्धाची असीम शांतता
करुणेचा सागर तू
अन्यायाने पेटून उठलास
झालास मूकनायक तू।
शिका संघटित व्हा
दिलीस शिकवण अवघ्या जना
बुद्धीच्या तेजाने भारलेस
सृष्टीला अन नभांगणा ।
आज पुन्हा तुझ्या विचारांनी
भारून जाऊदे मने
ये पुन्हा परतुनी भीमराया
समानतेची हाक दे।।