तू अन मी
तू अन मी
1 min
235
तू...
स्त्री स्वातंत्र्याच्या अन अस्मितेच्या विचारांनी,कल्पनांनी अनभिज्ञ ...
मी...
स्त्री म्हणून सिद्ध होणारी
रिंगण भेदण्यास आसुसलेली...
तू....
पुरुष या शब्दाशी प्रामाणिक
वर्चस्वाच्या वळणावर रेंगाळणारा..
मी...
बंधमुक्त होऊ पाहणारी
'स्व' त्वा साठी पेटून उठणारी....
तू...
मुक्त, अव्यक्त,माझ्या मनाच्या भिंतीपल्याड
तुझं वेगळंच जग....
मी...
व्यक्त ,आसक्त,उल्हासाची
आशेची पालवी.....
तू अन मी...
समांतर रेषा...मनातलं अंतर
वाढवणाऱ्या...
पण..व्हावं असं...
तुझ्यातल्या 'मी' ला समर्पित
माझ्यातलं 'मी'पण!
चैतन्याची पहाट उगवेल
क्षितिजावर.....
बहरेल जीवन..
मिटेल युगायुगांचे अंतर!