विरह
विरह


तू अशी...
अवचित आलीस
माझ्या रुक्ष जीवनात
रुजवात करून गेलीस..
नवलाईने न्हालेल्या
माझ्या अल्लड मनाची
गर्द छाया झालीस
पण....
पालवी अंकुरतानाच
पानझड देऊन गेलीस...
ती स्वप्ने जागेपणीची
हिरवं माळरान ,मुग्ध रानफुले
अवघा निसर्ग माझ्या डोळ्यात
पापण्यांच्या महिरपी
ओल्याचिंब करून गेलीस...
खरंच तुला आठवत नाही का
माझं फुललेलं एकाकी जीवन
रित्या मनाच्या गाभाऱ्यातील
वसंताचा बहर.....
खळखळणारे निर्झर
सळसळणारा निसर्ग
वाट पाहतोय तुझी
मला मात्र माहीत आहे
तू गेलीस.....
कधीही न येण्यासाठी...