STORYMIRROR

Kunjlata Patil

Inspirational

3  

Kunjlata Patil

Inspirational

सखी

सखी

1 min
255

सखी....

   तू तेजस्विनी

फिनिक्स पक्षासम

राखेतून उडी घेणारी

उंच भरारी घ्यायचीय तुला

आसमंतात...

गहिवर दाटल्या डोळ्यांनी

स्वप्न पहायचीत 

उजळून टाक तिमिराला

तुझ्या अस्तित्वाने.....


सखी.. 

तू उषा

अंधाराला दूर सारणारी

दग्ध फुले ओंजळीत घेऊनही

स्वत्वाने भारून टाकणारी

अवघं आयुष्य समर्पित

उरी वेदना लपलीय

अंतःगर्भित मनातील

मालवू नको आशा...

   प्रेरणादायी अनेक हात

   लाभतीलच तुला

   मी पाहीन सदोदित

   तुझ्या उत्कर्षाच्या खुणा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational