मुकी व्यथा
मुकी व्यथा
उन्हाच्या झळा आपल्या अंगाची लाही लाही करतात पण मुके जीव सांगू शकत नाही त्यांच्या भावना समजून आपल्याला होइल तेवढी त्याची मदत करायला हवी नाही तर ते मुके जीव आपल्याला शिव्या शाप देतील कारण त्याच्या या परस्थितिला आपणच जबाबदार आहोत तेव्हा थोडी जबाबदारी समजून घराच्या छतावर पाणी ठेवा जंगलातील पाणवठ्यांवर पाणी पोहचवा. पाण्याची बचत करा त्याची ही मुकी व्यथा समजून घ्या.
चिउ म्हणाली काउला
पाणी देतोस का बाळाला
सगळे रान हिंडुन सुध्दा
थेंब नाही ओठाला //
काउ म्हाणाला अग चिउ
काय सांगू माझी व्यथा
खूप टाकले खडे वेचुन
पण रांजणच रिता होता //
घशाची कोरड किती
वाढतेय भर दुपारी
बाळे माझी लहान कशी
झेलतील रे ही त्राही //
हरीण दादा म्हणाला
आता सगळे संपले
तळ्यातिल गाळातच
घट्ट पाय रुतले //
चिमणीला मग पोपट बोले
का ग तुझे डोळे ओळे
जंगलातील हालापैक्षा
पिंजऱ्यातले जीवन बरे //
खोटी जात या माणसाची
भुतदयेचा नुसता दिखावा
घोटभर पाण्यासाठी
लई छळ्ले मुक्या जीवा //
तळतळाट मुक्या जिवांचा
यांना आता भवनार
निसर्गाचा हा शत्रू
त्याच्याच पापाने मरणार //
