STORYMIRROR

Vivekanand Benade

Tragedy

4  

Vivekanand Benade

Tragedy

मृत्यू

मृत्यू

1 min
435


शेवटच्या क्षणाला माझ्या

जरा मृत्यू लवकरच आला, 


तो म्हणाला, भिऊ नकोस

वेळ आहे आजून जायला, 


आज वेळ जास्त काडून आलोय 

करून द्यायची आहे ओळख तुला

संख्या माणसांची तुझ्या


सगे सोयरे तुझे, तुझ्या मरणा आधीच सरणाची जमवा जमव करताहेत,


म्हणताहेत आताच जमवा जमवा करतो उगाच वेळ घालवायला नको


उघडया डोळ्यांनी बघ म्हणून

मृत्यू मला उठवून बसवत होता

आणि स्मिथ हास्य करून नात्याची 

ओळख करून देत होता,


सख्खा भाऊ निरोप देत होता

लवकर बघून जावा 

उद्याच काही खरं नाही,


कधी जातोय काही कळतं नाही

ह्यो गेल्या शिवाय

माझी काही सुटका काही होत नाही,


चेहऱ्यावरण अस वाटतंय 

आजून चार दिवस

 याला काही होत नाही

माझे चार पैसे खर्च केल्या शिवाय

ह्यो काही जात नाही,


मृत्यू माझ्या कडे, आणि मी

त्याच्या कडे पहात होतो,

आणि का लावकर आला 

ते मात्र ठामपणे सांगत होता.


कोण तरी म्हणाल पाणी घाला तोंडात

मरताना तरी सुखात मरू द्या

इतक्या दिवसात काही खाल्लं नाही

आत्ता तरी जरा खातोय का पाहू द्या


मृत्यू ने आता जायचा इशारा केला 

परत म्हणाला ही माई काय म्हणते ऐक

ती म्हणाली बर झालं मेला

ह्यांच्या तावडीतून तरी सुटला,


ऐकून जरा सुकावल्या सारख वाटलं

तिच्या पायावरती डोकं टेकवास वाटलं

मृत्यू परत हसला आणि चल म्हणाला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy