मृगनयनी
मृगनयनी
तुज पाहताच सखे
माझा मीच न राहीलो
गेलो मीच हरवूनी
तुझाच ग मी जाहलो
लावण्याची खाणच तू
छबी तुझी ग नयनी
हृदयातील स्पंदन तू
आहेस मृगनयनी
आकाशीचा चंद्र बघ
तुज पाहण्या आला ग
रातराणी बहरली
सडा फुलांचा पडे ग
स्वर्णकांती शोभे कशी
अप्सराच दुसरी ग
स्वप्नातील राणी माझ्या
जीवनच फुलले ग
साथ तुझी जन्मभर
लाभो मज अशीच ग
तुझ्या नयनात माझे
स्थान सदा राहू दे ग