STORYMIRROR

Kalpana Tembhurnikar

Fantasy

3  

Kalpana Tembhurnikar

Fantasy

मृदुगंध पावसात

मृदुगंध पावसात

1 min
214

प्रेम तुझे रे फुला, कसे ओसंडून वाहाते !

असे प्रेम पाहून माझे,अंतरंग भारावते !!


मोगरा तू,निशिगंध तू,तूच चाफा छान !!

रूप सौंदर्य पाहून तुझे,हरवून जाते भान !!


गुंफले कसे कळेना मज,आपले रेशमी नाते ! 

पहिल्या मृदुगंध पावसात,प्रीत दवबिंदूचे शिंपण होते !!


गंध तुझा ,मधूरस तुझा,किती आवडे मला ! 

तुझ्या मधे विलीन झाले,केव्हा कळेल तुला !! 


कासावीस झाले तुझ्या भेटीची,वाट मी पाहाते !

ओढ लागली तुझीच ,नयन अंथरून वाटेत ऊभी राहाते !!


प्रेम आपले अबाधित, अशीच सदैव राहू दे ! 

जन्मोजन्मीची प्रीत आपली स्वप्नं, पुरे होऊ दे !! 


पाऊस पहिल्या प्रेमाचा,मन ओलेचिंब भिजते !

आठवता प्रेम तुझे हे ,अंतरंगात भारावते !! 


पाऊस पहिल्या प्रेमाचा ,मिलनाचा आनंद घेऊ ! 

ये ना सख्या जवळी असा ,पाऊस सरीत विलीन होऊ !! 


जाऊ नकोस तू दूर , असा लोटून मजला ! 

आयुष्यातील सुखद क्षण हे, जीवनभर स्मरू आजला !! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy