STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Classics Fantasy Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Classics Fantasy Inspirational

पाऊस

पाऊस

1 min
14.2K


आकाशात पक्षी येरझऱ्या घालत होते,

त्यांना धरतीचे दुःख सहन होत नव्हते...

पर्जन्य राजाला मनातले सांगायचे होते,

दुःख सारे धरतीचे साठलेले होते...


पक्ष्यांनी निरोप पर्जन्य राजाला दिला,

धरतीला तर खूप आनंदच झाला...

सर्व काही दुःख पर्जन्य राजाने ऐकले,

सर्व ढगांना त्यांनी निमंत्रित केले...


सर्व आकाश काळकुट्ट झाले,

दिवसासुद्धा अंधारमय भासले...

गार, गार वारा चोहीकडे सुटला,

एकदाचा तो आवाज करू लागला...


ढगावर, ढग घसरू लागले,

विजेच्या भयाने मानव घाबरले...

सैरावैरा सारे घराकडे धावले,

पर्जन्य राजाचे आगमन झाले...


इच्छा धरतीची त्यांनी पूर्ण केली,

पाणीच, पाणी धरतीवर झाले...

सर्व प्राणी, पक्ष्यांचे मन तृप्त केले,

तहानलेल्या धरतीला पाणी पाजू लागले...


भेगाळलेल्या जमिनीत बीज पेरले गेले,

हळूहळू कसे बाळसे धरु ते लागले...

सर्व शिवार चौफेर हिरवेगार नटले,

धरतीच्या जीवांंना पोटाचे आधार झाले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics