STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Fantasy

3  

Vasudeo Gumatkar

Fantasy

माय मराठी

माय मराठी

1 min
14.8K


ही माय मराठी भाषा

गोड ही अमृतावाणी

पिणार जो अमृताला

होई त्याची गोड वाणी


मराठीचा इतिहास

पराक्रमी खूप असे

शब्द कमी पडतात

रक्तात भाषेच्या दिसे


जिंकून दिल्लीची गादी

वाढविली बघा शान

फडकविला हा झेंडा

उंचावला बघा मान


जन्म घेतला भाषेत

वाटे मज अभिमान

पाहून भाषेची गोडी

करितो तिला वंदन


लाविले झेंडे दूर त्या

खूप देश विदेशात

असे महती भाषेची

मराठीची या जगात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy