मुक्त मराठी..
मुक्त मराठी..
डिजीटलची शनिपिडा आज पाहिली
एक दुर्वांची जुडी बेपत्ता पत्रासाठी वाहिली...!!!
पत्र निघाले धीर धरवेना
केंव्हा येणार हे काहीच कळेना...!!!
आतुर असून काही उपयोग नाही
आमच्या पत्राला सांगा कोण वाली...?
अधांतरी डिजिटल क्रांति
शोधतोय मी माझ्यातच भ्रांती...!
वाटले क्षण भर नाद सोडून द्यावा
पण पत्राविना श्वास कसा घ्यावा ते कळेना...!
