STORYMIRROR

Vaishnavi Lalgunkar

Fantasy

3  

Vaishnavi Lalgunkar

Fantasy

पावसाळी दिवस

पावसाळी दिवस

1 min
13.4K


पावसाळ्याचे दिवस आहेत

जरा जपून वाग...

कुठे कुठे आपल्या आठवणी,

जुन्याच....

पेरून ठेवलेल्या

तुला पुन्हा दिसतील !


त्यांचे आता भले मोठे वृक्ष झालेत.

त्याच वृक्षांच्या सावलीत

आपण आपापल्या वाटेवर जगतोय...

तिच वाट दर पावसाळ्यात इकडे वळवतोस

आणि,

अजूनही मुळापाशी स्वप्नाळलेल्या मला,

पावसाच्या टपोऱ्या थेंबांचं,

सूर्यप्रकाशाचं आणि

तुझ्या मायेचं आमिष दाखवतोस !


मात्र,

या पावसाळ्यात ढगफुटी संभावते आहे

जरा जपून वाग,

पावसाळ्याचे दिवस आहेत !


Rate this content
Log in

More marathi poem from Vaishnavi Lalgunkar

Similar marathi poem from Fantasy