STORYMIRROR

Vijay Sanap

Fantasy

3  

Vijay Sanap

Fantasy

येता श्रावण

येता श्रावण

1 min
15.3K


आला आषाढ श्रावण

बरसती जल धारा

झाल्या पाय वाटा ओल्या

नद्या निघाल्या माहेरा ।।


माय धरा श्रावणात

शालू नेसती हिरवा

वृक्षवेली बहरती

रान फुलाचा देखावा ।।


आला पंचमीचा सण

लेक येतील माहेरा

नागोबाला पुजायला

शोधे वारुळ वावरा ।।


श्रावणाच्या महिन्यात

रोज कोसळती सरी

गाते मही लेक गीतं

पंचमीच्या झोक्यावरी ।।


वृंदावनी गोपिकांचा

खेळ चाले रोज नवा

बाळकृष्ण गोकुळात

सवे वाजवितो पावा ।।


येता श्रावणाच्या धारा

मन होई ओलं चिंब

रानी फुलवी पिसारा

पडू दे रे थेंब थेंब ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy