विद्रोह
विद्रोह
कधी कधी करतो मी विद्रोह सुद्धा |
करतो कारणांचा मी उहापोह सुद्धा |
असेल नजर माझी शांत कदाचित,
ज्वालामुखीचे आहेत ते डोह सुद्धा |
माझे स्नेही, बंधु, माझे मित्र म्हणे ते,
ऐकला नाही त्यांनी माझा आरोह सुद्धा |
एक कटाक्ष तिचा अन मी भारावून गेलो,
जाणत असावी ती कदाचित संमोह सुद्धा |
असा अनोळखी भेटलास काल रस्त्यावर प्रशांत,
पुन्हा भेटण्यास केला नाही मी आग्रह सुद्धा |
