तुला सांगायचे राहुन गेले
तुला सांगायचे राहुन गेले
कुठेतरी वहीच्या पानावर,
ह्रदयात काढलेले,
हातावर लिहून पुसलेले
शतदा कोरलेले,
तुझे नाव.. तुलाच सांगायचे राहून गेले...
मागच्या बाकावर बसून,
तुला निरंतर पाहिलेले
दहा पावले मागे तुझ्या,
दरवेळी चाललेले
ते क्षण...तुलाच सांगायचे राहून गेले...
त्या रोझ डे ला
घेतलेले गुलाबाचे फुल,
आज सुकलेले तरीही
मी जपलेले फुल,
सखे...तुलाच सांगायचे राहून गेले...
तुला सोडून
सर्वांना कळलेले,
अबोल तरीही,
मनापासून जगलेले,
प्रेम.. तुलाच सांगायचे राहून गेले...

