रोज एक नवीन पहाट
रोज एक नवीन पहाट
सूर्य उगवले, नमन झडले, झाला त्रिवार मुजरा
वारा सुटला, प्रेम पसरला, हसला खुळा तो रातराणीचा गजरा...
सायंकाळी नाचत होते काल आभाळ जे
गर्जत, ओरडत, रडत होते इवलेसे बाळ ते
दमून मग तो झोपी गेला, रात्र आली खिळून
दुख सारे पाण्यासकट, गेली ती गिळून...
सूर्यप्रकाशाने उजळून आला सारा तो पसारा
निरखित होते आज नयन ते, साफ पाण्याचा नजारा
कोकिळा गाते पहाट होता, होते विहिरीवर खळखळ
पूजे ची थाळ सजवूनी, शोभे असा श्रीफळ...
होते दुःख काल किती, त्याला मागे विसरून
घराघरातुन बाहेर पडले, नंद उत्साही हसून
दिवसभराचे काम आपुले करती सगळे चोख
कुजबुज नाही कालची, कसले उरते शोक?
जगण्याची ही रित कशी?
निसर्गाची ही प्रीत अशी
पुन्हा अंधाराची बनवून उशी
पांघरून घेई सांज अशी …
कुठल्याही दुःखाने न थांबणारे आयुष्य …
