STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Fantasy

3  

Sanjay Raghunath Sonawane

Fantasy

निसर्गाच्या सहवासात

निसर्गाच्या सहवासात

1 min
14.1K


हिरव्या जंगलात सर्व बालमंडळी आले

फुले रूपी मुले आनंदाने खेळू, बागडू लागले

गार हवेच्या स्पर्शाने आणि रवि राजाच्या किरणांनी

निसर्गाचा आस्वाद मनमुराद घेऊ लागले


फुले रंगीबिरंगी नाना प्रकारची होती सोबतीला

मन मोहून टाकणारा रविकर होता संगतीला

निरभ्र आकाश, स्वच्छ सोनेरी प्रकाश आस्वाद देण्याला

बालकांचा कंटाळा, निसर्ग राजाने घालविला


मन उदास झाले जेव्हा निघालो परतीच्या वाटेला

मनमुराद आनंदासाठी पुन्हा व्याकुळ झालो

वाटे करावा इथेच सहवास, कायम रमण्याला

मुक्त पक्षी, प्राणी त्यांच्या सोबतीला खेळण्याला

एकांताच्या विसाव्याला, सर्व दुःख विसरण्याला


हीच श्रीमंती असे बालमनाची, आनंदाची,आयुष्याची

हेच जगणे असावे नित्याचे, निसर्गातून शिकण्याचे

मुक्त खेळू द्या, बागडू द्या हे जीवन सूत्र जगण्याचे

नका देऊ हो बोझा दप्तर, शिकवणी अन जीवन त्रासाचे

कोमल वय हे हक्क आहे त्याच्या जीवन रूपी फुलांचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy