STORYMIRROR

Shital Yadav

Fantasy Others

3  

Shital Yadav

Fantasy Others

अनुभूती

अनुभूती

1 min
13.4K


ऋतू हिरवे हिरवे, ऋतू असे हे बरवे

पानापानांवर प्रकाशती सानथेंब गोजिरे

जिकडे तिकडे आनंदीआनंद सोहळे

अंगणी प्राजक्त फुलांचा मधुगंध दरवळे


निळ्या झऱ्यातल्या झिरवणीची गोडी

स्वर्णिम लता वेलीत गुंतली अशी वेडी

हिरव्या गालीच्यावर मन खेळे फुगडी

आरास तेजस्वी नक्षत्रांची पारणे फेडी


गार मंद वारा कलरव पक्षी करती

तरुवरही समस्त नवपालवीने बहरती

फुलाफुलांवर भ्रमर हर्षूनी थिरकती

गुणगुणती कलिका हिंदोळ्यावर डोलती


फुलपाखरु सृष्टीचे नवरंग उधळती

कारागिरी ईश्वराची दिसे पंखावरती

ओथंबूनी सरिता ही खळाळून हसती

नभी सौदामिनी अनुरागाने नृत्य करिती


प्रभातसमयी गंध पुष्प देवास अर्पिती

दिशादिशांत निर्मळ शंखध्वनि घुमती

वनदेवीस वृक्षवल्ली नतमस्तक होती

सर्वव्यापी अद्वैताची येई दीव्य प्रचीति



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy