STORYMIRROR

Arun V Deshpande

Fantasy Inspirational

3  

Arun V Deshpande

Fantasy Inspirational

तो पाऊस मनभावंन होता .

तो पाऊस मनभावंन होता .

1 min
14.3K


चिंब चिंब भिजवुनी गेला

तो पाऊस मनभावन होता …॥


उन्हाची कठोर काहिलीत

धरती सारी शिणून गेली

नखशिखांत तृप्तीचा दाता

तो पाऊस मनभावन होता …॥


विराण झाल्या होत्या बागा

कोरड्या ठप्प साऱ्या सरिता

मुक्त मनाने कोसळून गेला

तो पाऊस मनभावन होता …॥


तुझ्या सवे पावसात फिरणे

पाऊस हवाहवासा होता

चिंब चिंब भिजवुनी गेला

तो पाऊस मनभावन होता …॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy