मराठी भाषा गौरव
मराठी भाषा गौरव
माय मराठीचे ऋण
बाई फिटता फिटेना
जिने जोजविली जनी
तुका ज्ञाना आणि नामा
तिच्या पान्हाने पोसले
अनिल नि बालकवी
' पु.ल.' लेक गं लाडका
काय वर्णावी थोरवी
दिले ' शांता , इंदिरे 'ला
मोठे खेळावया अंंगण
शब्द अक्षषरेही दिली
मराठीने गं आंंदण
वि.दा.सारखा निडर
पुुत्र पोटी जन्मा आला
देशप्रेम संंगतीने त्यास
वसा साहित्याचा दिला
बाकी विवा नि गदिमा
झेेंडा मराठी घेवूनी
फिरवती मराठीस
माझ्या त्रिलोकामधुनी
दुर्गा मंंगेश प्रवीण
पद्मा प्रल्हाद सुधीर
बहिणा नि नारायण
वाही धुरा खांद्यावर
माझ्या मराठी मायेची
कशी चालते दिंडी
किर्ती पसरल दूर
तिची अवघ्या त्रिखंडी
