"मराठी असे अमुची मायबोली"
"मराठी असे अमुची मायबोली"
दऱ्या खोऱ्यांनी वेढला महाराष्ट्र
शिवरायांच्या इतिहासाची प्रचिती
मराठी असे आमचा अभिमान
स्वाभिमानी हिच प्रत्येकाची निती.
अवघ्या महाराष्ट्राचे भूषण मराठी
मराठी असे अमुची मायबोली
दर बारा कोसांगणिक बदलते ती
उच्चारात, शब्दसंग्रहात मराठ मोळी.
विदर्भाची वऱ्हाडी, घाटावरची घाटी
मराठवाडा बोले मधुर अहीराणी
गावागावात बदलते ही बोली भाषा
कोकणातले बोले मवाळ कोकणी.
संत वाङ्मयातली अविट गोडीची भाषा
ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा
असे श्रेष्ठ साहित्य सामान्य जन लोकां
आज ही भक्त झुकवितो त्यावर माथा.
साहित्य संस्कृतीत मराठी साहित्य श्रेष्ठ
खांडेकर,काळे,अत्रे,पु.ल. शिरोमणी मोठे
बालकवी,केशवसुतांची गीत मांदियाळी
मराठीची शान पहा पोहचली कोठे कोठे?
लय, सूरातली मराठी अमुची मायबोली
सर्व भाषांत महती तिची तुम्ही जाणा
माते समान जवळ आणी ती सर्वां
महाराष्ट्रातल्या लोकांचा पहा मराठी बाणा.
