मोरपीस ....!
मोरपीस ....!
तुझी वही
तुला परत करताना
तुझ्या नकळत
मी त्यात एक मोरपीस ठेवलं होतं,
तू ते बघितलं की नाही
विचारात गुंतलेलो असताना
दुसऱ्या दिवशी
तीच वही तुझ्या हातात दिसल्यावर
माझं मन
आसमंतात झुलायला लागलं
कधीतरी तुला भेटायला
तुझ्या घरी आलो असता
दिवाणखाण्यातील
एका कोपऱ्यात
मोरपिसांचा भला मोठा फ्लॉवर
सजलेला दिसला

