मोकळी हवा
मोकळी हवा
1 min
375
मोकळी हवा,
पहाटेचा गारवा,
साथीला तू हवा,
मिठीचा गोडवा।।
केसात मारवा,
गंध बरवा,
कळी खुलवा,
हास्य फुलवा।।
झोपाळी झुलवा,
बागेत फिरवा,
अंगार चेतवा,
प्रणयी ठसवा।।
पिवळा बहावा,
अंगणी फुलावा,
पानांचा हिरवा,
गंधच माळावा।।
चित्ताचा विसावा,
चरणी असावा,
मनात नसावा,
मत्सर कडवा।।