मोकळा श्वास
मोकळा श्वास
मातृत्व आल तिच्या नशिबी.
सांभाळल तिन तिच्या पोटी.
तळ हाताच्या फोडा प्रमाणे.
नउ महिने नउ दिवस .
असाह्य वेदना सहन करुणी.
तो चिमुकला जिव या दुनियेत
येण्याआधी सर्व कुळ त्याची वाट पाही.
वेळ आली आता प्रसवण्याची .
प्रसव वेदना जणु प्राण हाणी.
म्हणुनच तो चिमुकला जीव येई
मरणाच्या विळख्यातुन जिवनाच भाग्य घेउणी.
जन्मताच काणी येई रडण्याचा
कवळा ध्वनी एकुणी सर्वत्र आनंदित होइ.
उसुक्ता लागे अंतरी एक हुरहुर
चेहर्यावर आनंद पण एक वेगळीच भिती
एकच प्रश्न सर्वांच्या मनात येइ
मुलगा झाला की मुलगी.
दाई घेउण येई नव अंकुरास गुंढाळुणी
कान सर्वांचे दाईच्या वाणीकडे लागे.
वदताच दाई मुलगी झाली
क्षणात सारे गप्प पडती
आनंदाची घटका निराशेत बदलली
पितृत्व त्याला लाभल तरी तो नाराज होइ
कुळ मंडळिच तरि काय
मुलगी झाली म्हणुन कपाळावर आटी.
काय म्हणाव या स्वार्थीपणाला.
मुलगा झाला तर गावभर ढिंढोरा पिटवी
अन् मुलगी झाली तर जुन अतिंम यात्रेचा शोक करी.
जन्माला आला एक निष्पाप जिव
त्या जिवाला लाभल स्त्री रुप म्हणुन काय चुक झाली
स्त्री जन्म का हो खरच इतका वाइट.
कुठ उमलण्या पुर्वी तोडायच.
तर कुठ उमलल्यावर चुरगळायचं
करतयं का कुणी अचुक भविष्य
तिचसाठी होइल ती सावित्री रमा इंदिरा
ह्या दुनियेत परत सांगतय का अचुक कुणी
फार स्वार्थी जिवन आहे जे
उपकारात मिळालय इथ
आई हवी बहिन हवी मैत्रिन हवी
इथ प्रियेसी हवी इथ बायको हवी
आजी पण हवी इथ.
स्त्री उपभोग पुर्ण पणे
मग स्त्री जन्म का नको.
काय तिला नाकारायच
खरतर आपनच तिचे कर्जदार
मरणाच्या दारात उभु राहुन तिन
आपल्याला जिवनदान दिलय छान.
तोंड करा काळ त्याचं जे स्त्री जन्म लेखतात तुच्छ .
अन् द्या त्यांना देह अंताची शिक्षा जे स्त्रीभ्रुण हत्या करतात.
घेउद्या तिला पण मोकळा श्वास
नका खुंटउ जिवन तिच
आहे ती या धरेवरील माय .
