STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

मोकळा श्वास

मोकळा श्वास

1 min
286

असहाय्य वेदनेने त्रासलेला देह माझा 

क्षणोक्षणी मागतो आहे एक मोकळा श्वास 

मनाच्या खोल कोपर्यात कुठेतरी दडला आहे 

आनंदी जगण्याचा नवा एक नवा ध्यास 


आतल्या आत रडणारी माझी माणसं 

दिवसरात्र आहेत माझ्या दिमतीला 

माझ्या वेदनेला शमवता शमवता 

विसरली नाहीत आसवांच्या किमतीला


रोजचा दिवस मात करतो आहे मरणावर

वाढवतोय आशा एक दिवस जगण्याची 

माझे अश्रू मात्र देतात दगा मला 

शोध घेत राहतो एका आशेच्या किरणाची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy