मोह सुमनांचा
मोह सुमनांचा
मोह सुमनांचा लागी
जिवा आसक्तीची माया
मोह सुगंधास लागी
डोळा आरक्त नयनी
भाव कोवळा मानसी
ऋतू हिरवा जीवनी
भास कोमला मनासी
सांज संजीवनी जशी
मोह आवरूनी सांगी
भक्ती कोवळ्या फूलांची
रात्र सावरुनी जागी
कला चांदण्यांची अशी
मोह चाफ्यांचा पाहूनी
रातराणी जागे उगी
बोल अंतरीचे बोलुनी
मोह सुमनांचा मनी
गंध बावरा का होई
प्रिती वेड्या त्या फुलाची
छंद समिरास लावी
ऋतू बावरा जरसा
आस मनास या लावी
आशा कोवळ्या कळीची
जीवा भुरळ ती घाली

