STORYMIRROR

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Romance

4  

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Romance

मोगऱ्याचा गजरा

मोगऱ्याचा गजरा

1 min
575

शरीर आपले थकले 

मन मात्र तरुण आहे 

प्रेम या मनात अजून

 भरभरून आहे 


संसाराचा हाकता गाडा

दोघांसाठी जगलोच नाही 

तू मला अन् मी तुला कित्येक

दिवस डोळे भरून पहिलेच नाही


आता जगू प्रत्येक क्षण 

फक्त आपल्या दोघांसाठी 

कर्तव्य जबाबदाऱ्या संपल्या

आता जगू फक्त प्रेमासाठी


हरवलेला एक एक क्षण 

आणू पुन्हा गवसून 

मी आणेल मोगऱ्याचा गजरा

तू बस खोटे खोटे रुसून


आयुष्याच्या संध्याकाळी

जाऊ आठवणीत पुन्हा रमून

शेवटच्या श्वासापर्यंत

आता घेऊ नव्याने जागून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance