STORYMIRROR

Smita Murali

Romance

2  

Smita Murali

Romance

मोगरा फुलला

मोगरा फुलला

1 min
485

रिमझिम बरसल्या

पावसाच्या धारा 

हिरव्यापानी फुलला

पांढराशुभ्र मोगरा


मोगऱ्याची वेल प्यायली

पावसाचे गार पाणी 

बहरल्या शुभ्रकळ्या

हिरव्या पानोपानी


पावसात न्हाहलेली

वेल झाली ओलीचिंब

पाने फुले झेलतात

पावसाचा प्रत्येक थेंब


वेलीचं हिरवं रुप

पावसात न्हाऊन खुललं

कळीचा इवलं रुप

फुलरुपात फुललं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance