मनपाखरू
मनपाखरू
मनपाखरू होईन मन हुंदडत
पाण्यापावसात चिंब भिजतं
वाऱ्यासंगे सुसाट लावतो शर्यत
निसरर्गाच्या कवेत खेळतो मनसोक्त
नशिबाला देतो हूल बिनधास्त जगून
चिडवून संकटाना जिव्हा तू दाखवसी
मार उंच उडी दाखव जगण्याची जिद्द
शिखर गाठाया साथ आत्मविश्वासाची
आलेल्या संकटाशी असावे सादर
गांठ बांध उराशी नाही फिरणार मागे
भिजलेल्या वेदनेला पावसाचा जागर
ठेचाळले पाय तरी दार उघड यशाचे
ठसा उमटव स्वतःचा चित्रबिंबव मनात
निसर्गाचा वसा अंगी बाळगून भिरभिर स्वतंत्र
प्रतिबिंबित होऊन समाजाला दिशा दाखव
संशोधन करून प्रतिनिधित्व कर आयुष्याचं

