मंगळवार..सकाळ..!
मंगळवार..सकाळ..!
दाट ढगांची राखट
चादर घेऊन तू अजून
आळसात का..?
का रे बाबा
तापून तापून
दमलास का...!
तुझ्यासाठी
सकाळी सकाळी बघ मी
लवकर उठून आलो
वाटले कारे तुला
खरेच का मी
आळशी झालो...!
संकल्प बाबा
लवकर उठण्याचा
मी केला
असा नजरे आड होऊन
नको ना रे वाटू देऊ
तू घात केला
ये लवकर
पटकन ढगांची चादर फाडून
सारे चोचले आरामाचे सोडून...!
