मंगळवार सांज...!
मंगळवार सांज...!
आठवड्याचा आळस काढलास
दिवसभर ढगाआड झोपून
आणि जाता जाता
मुखडा दाखवलास क्षितिजावर झुकून
तुला काय माहीत
दिवस किती घालमेलीत गेला
वरचा जीव वर
खालचा जीव खाली झाला
आता कान देऊन ऐक
उद्या न चुकता वेळेवर ये
संकल्प केलाय रे बाबा
तुला पहाटे पहाटे पाहण्याचा...!
