STORYMIRROR

Anita Bodke

Tragedy

4  

Anita Bodke

Tragedy

मंदिराचा बाबरीचा....

मंदिराचा बाबरीचा....

1 min
253

मंदिराचा बाबरीचा प्रश्न मोठा वाटतो 

की, भुकेचा भाकरीचा प्रश्न मोठा वाटतो ?


कोरडा दुष्काळ पाणी प्यायला आणू कसे ?

या रिकाम्या घागरीचा प्रश्न मोठा वाटतो


रोज पोशिंदा जगाचा का उपाशी झोपतो

हाच घामाच्या सरीचा प्रश्न मोठा वाटतो


जीव घेते रोजदारी वाटते येथे कुणा

तर कुणाला नोकरीचा प्रश्न मोठा वाटतो


राधिका मीरा तुझी की सत्यभामा रुख्मिणी ?

सावळ्याच्या बासरीचा प्रश्न मोठा वाटतो


गाठली उंची कड्याने एवढी कोणामुळे

खोल जाणार्‍या दरीचा प्रश्न मोठा वाटतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy