STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

मनभावन श्रावण

मनभावन श्रावण

1 min
272

झडझड आषाढाची, आता सरली गं सये

रिमझिम सरी आल्या, आला श्रावण गं सये   (1)


घननीळ बरसतो, नद्या, धबधबे वाहती

प्रपातांचे शुभ्र पाणी, तुषार ये अंगावरी    (2)


वसुंधरा सजली गे, हिरवी वस्त्रे लेऊनीया

साज फळांचा फुलांचा, स्वागताला घालूनीया  (3)


मंद वाऱ्याची झुळूक, कुंदवात दरवळे

चैतन्य हे पानोपानी, सख्या झडकरी तू ये   (4)


वरुणाच्या सरी आता, रिमझिम बरसती

वसुंधरेच्या स्वागता, आतुरला गं तो चित्ती   (5)


रश्मी किरणांमधूनी, ऊन हळदुले झरे

अंबरात सप्तरंगी, इंद्रधनू गोफ सजे   (6)


रिमझिम सरी येती, क्षणभरे थबकती

अभ्रांतूनी रविराज, हळूहळू डोकावती   (7)


रिमझिम सरींसवे, आला आला गं साजण

भेट एकांती फुलेल, आता आतुर मन्मन    (8)


रिमझिम धारांमधे, तन मन सुखावेल

ऊन पावसाचा खेळ, मधुमीलन उमलेल   (9)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract