मनातील भाषा....
मनातील भाषा....
मनातील भाषा डोळ्यातून ओघळते,
भावनेचे प्रतिबिंब त्यात उमटते...
मनाची भाषा मनालाच कळते,
नजरेशी जेव्हा नजर एकरुप होते.....
मनाची भाषा मनालाच उमगते,
ह्रदयातील ममत्व डोळ्यातून दाखवते...
प्रितीचे भाव स्पर्शातून जाणवते,
मुक्यानेच खूप काही बोलून जाते....
काहीही न बोलता कितीतरी सांगता येतं,
हेच तर मला, सतत तू सांगत आलीस...
मनाची भाषा तुझी,
मला शिकवत गेलीस....
जाणीवेच्या स्पर्शाने,
जीवन माझे मोहरुन टाकलेस....
मधूर तुझ्या हास्याने,
स्वच्छंदी दुनियेत नेऊन सोडलेस....
मी वेडी मात्र, शब्दाशब्दांतून तुलाच मांडत गेले,
माझ्या कवितेच्या प्रत्येक ओळीत तुलाच साठवत राहिले.....
विचार नाही जुळतं
पण मनाच्या भाषा आपल्या जुळल्या आहेत,
ऋणानुबंधाच्या गाठी दैवानेच आपल्या बांधल्या आहेत....

