मनात तिच्या....
मनात तिच्या....
सकाळ सुंदर होती
वातावरणही मस्त होते
पण खिडकी समोरच्या त्या
बागेत काहीतरी वेगळंच घडत होते...
कळी सारखा उमलला होता
फुलासारखा खुलला होता
पण ती काट्या सारखी रुतत होती
तिला तो विनवणी करत होता
सकाळ सुंदर होती
वातावरणही मस्त होते
खिडकी समोरच्या त्या
बागेत ती नकार देत होती
प्रेमाच्या झुल्या वर
तो बसला होता
का कुणास ठाऊक
तो तिच्यावर अवेक्त प्रेम करत होता
मनात तिच्या आज
कहर होता
न जाणंलेला तो
तिच्या समोर होता
भावनांच्या हुंदळ्यात
सकाळ ती निरभ्र होती
तिच्या सौंदर्यात
बाग ही ती खुलली होती
होते शब्द तिचे मुकलेले
फुल ते आज का सुकलेले
प्रश्नांचा होता भडिमार
प्रेम होते ते अपरंपार....

