मनाच्या कोपर्यास सापडलास
मनाच्या कोपर्यास सापडलास
एका वळणावरती तु हसलास ,
मनाच्या कोपऱ्यास सापडलास ,
आतुर झाल्या झाकोळून गेल्या दिशा,
असा तु अंतरंगात उतरलास ...
व्यापुन टाकले जग माझे ,
विश्वच माझे हरवलेस ,
उसंत ना मला कशाची,
मी तुझे , तु माझे नाव जपलेस ...
चालतांना सवे मग ,
असे का? ठेचाळलेस ,
उरल्या विरहाच्या विवंचना ,
सांजेचे दुःख सागरा तु ना वेचलेस ...
अशी आली ओहोटी मनाला,
तु दुर उभा पाहून हसलास ,
आज पुन्हा झाकाळून आल्या मनाच्या दिशा,
तु मनाच्या कोपऱ्यास सापडलास...
