STORYMIRROR

Pandit Warade

Romance

5.0  

Pandit Warade

Romance

मनाचं पाखरू

मनाचं पाखरू

1 min
804


तुला पाह्यता डोक्यात

वारं भन्नाट शिरतं

मह्या मनाचं पाखरू

तुह्या भवती फिरतं।।१।।


कसं समजावू येडं

आयकता आयकना

तुह्या भवती फिरून

कसं थकता थकना।।२।।


तुह्या डोळ्याचं काजळ

पांघरलं धरतीनं

तुह्या मिठीत साजणी

रात फुले पिरतीनं।।३।।


घाल आवर केसाला

तुहा मुखडा माखला

जणू चांद पुनवचा

काळ्या ढगानं झाकला।।४।।


तुह्या अधराची लाली

कशी पसरली गाली

खेळ रातीचा पाहून

पूर्व दिशाही लाजली।।५।।


काढ गळ्यातले हात

उबदार मिठी सोड

ठेव आठवणी मधी

खेळ पिरतीचा गोड।।६।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance