मनाचे खेळ
मनाचे खेळ
मोराच्या पंखासवे मन माझे मोहरून गेले
हिरव्या निळ्या रंगांनी डोळे हरखूनी गेले
कले कलेने प्रेम माझे वाढत गेले
चंद्राच्या मंद प्रकाशात उजळूनी गेले
नयनांत छवि त्याची उमटवून गेले
गालांवर लाजेची खळी पाडूनही गेले
त्याच्या आठवणींना आठवून शहारून गेले
ऋदयात खोल माझ्या घर करूनी गेले
सुमधुर कोमल स्वप्नांना साठवून गेले
सुंदर भविष्याची कडी गुंफवूनी गेले
अशा या मनमोहक विचारांत हरवून गेले
मनाचे खेळ हे वेगळे एकांतात हसवूनी गेले

