STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

4  

Meenakshi Kilawat

Tragedy

मनाचे बागीचे

मनाचे बागीचे

1 min
433

आशेच्या ओझ्याखाली दबले 

अजब रंग हे या जीवनाचे

दिखावटीची भेट होता इथे

गलबलतेय मनाचे बागीचे..


हे ग्रहतारे आकाशातील 

लावीते ऋतु निसर्ग लळा

नाही मनातील दु:ख निवारी

अजूनच देतिया जीवन झळा..


नद्या डोंगरे तळे सागरे

दगड मातीने भरकटले

अंगअंगात थिजूनी झरते

मानव देह हे तडफडले..


स्वार्थापायी जगणे विसरले 

इंद्रधनुच्या रंगात मिसळूनी

माया-ममतेस अव्हेर करुनी

शोधात जगता गुरफटूनी..


आयुष्य हे अनमोल आहे

बघुया हे रंग जीवनाचे किती

दुःखाने पोळलो जरी आता

नाही थांबणार मी इथे कधी..


करते स्वागत..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy