STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Tragedy

3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy

मनाचा तिच्या थांगपत्ता नसतो...

मनाचा तिच्या थांगपत्ता नसतो...

1 min
238

अडकले ती विळख्यात कोणाच्यातरी स्वार्थापायी बरबटलेल्या या दुनियेत

तिचं अस कुणी नाही

बाजार करुनि देहाचा भरते पोटाची खळगी चकचकीत दुनियेत आत्म्याला

तिच्या स्थान नाही

रंगवलेल्या चेहऱ्यामागे दुःखाचा खोल डोह असतो भिरभिरत्या नजरेत

प्रेमाचाही शोध असतो

रात्रीच्या अंधारात खेळ तिचा चालतो निर्जीवरुपी देहात श्वास फक्त चालू असतो क्षणिक सुख मिळवून खुशाल तिला लाथाडून दुसरा उंबरठा चढलेला असतो

रात्रीतला कुशीतला तिचा चेहरा

उद्या त्याच्यासाठी अनोळखी असतो विस्कटलेले केस सावरत

चंदेरी मुखवटा चढवून

पुन्हा ती हसत जगाया उभी असते

मरण रुपी जगण्यासाठी तिची धडपड असते त्यातूनच जन्मलेल्या अंशासाठी

जीवाची घालमेल असते

पिंजरा तोडून उंच उडायचे असते

पायात मात्र कायमची जखडण असते कोरड्या नजरेतही मायेचा ओलावा असतो शून्यात लावलेल्या नजरेत

स्वप्नांचा थवा असतो

तुच्छ नजरेचा नाही..

सन्मानाचा एक क्षण हवा असतो

मायेच्या ममतेची कुठेतरी आस असते सोबतच वास्तवातल्या

चटक्यांची जाणीव होते

वनवासाचा अंत पाहत देह सारा झिजतो तिच्या मनाचा थांगपत्ता मात्र कोणासही नसतो.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy