STORYMIRROR

UMA PATIL

Abstract

3  

UMA PATIL

Abstract

मन

मन

1 min
13.7K


मनाची पतंग उडते

उंच उंच वाऱ्यावर

अताशा चित्त माझे

राहत नाही ताळ्यावर


धुंदीत राहते सदा

करू नये ते करते

ये ना आता साजणा,

मन तुझ्यासाठी झुरते


मन झाले सुगंधी अत्तर

तू आणि तूच माझा राजसा

मी हृदयी घायाळ हरिणी

मला तूच आहेस रे साजेसा


तुझ्याकडे मन थांबते

तनही होते तुझेच

सर्वस्व अर्पिते तुलाच

काही नाही माझेच


तू आलास की, शांत वाटतं

बनूनी मोर, मन नाचे थुईथई

नसता तू, अश्रू लपवण्यासाठी

कमी पडते ही अथांग भुई...


मी नटते, लाजते, मुरडते

पडता तुझा एक कटाक्ष

करते घायाळ नजर तुझी

आहेस भलताच चाणाक्ष


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract