मन
मन
का वाटते कधी अचानक
पंख फुटावे
नभात उडत्या बगळ्यांच्या
थाव्यात शिरावे
का वाटते कधी अचानक
रानात फिरावे
नृत्य करत्या मोरा सम
मी नाचावे
का वाटते कधी अचानक
गुलाब व्हावे
वाहत्या वाऱ्यात मिसळुनी
सुगंध द्यावे
का वाटते कधी अचानक
स्वप्न बनावे
कुशीत निजल्या सख्याच्या
डोळ्यात वसावे

