STORYMIRROR

Kishor Zote

Abstract Others

3  

Kishor Zote

Abstract Others

मन (सहाक्षरी)

मन (सहाक्षरी)

1 min
355

मन आकाशाला

घाले गवसणी

मन दिसे जणू

ते आरस्पानी


मन गुंतागुंत

कशी सोडवावी?

मन शांत शांत

समाधी मोडावी?


मन हळुवार

जडे कुणावर

मन बेभानच

स्वैर वाऱ्यावर


मन चंचल ते

कसे सापडावे?

मन तरंगच

कसे पकडावे?


मन तुझे माझे

एक असे व्हावे

मन मनात ते

विरूनच जावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract