मन माझं स्वप्नाळू
मन माझं स्वप्नाळू
जग हे आभासी
मन माझं स्वप्नाळू
डोळे बंद होताच
दंग होते मी स्वप्नात
सफर होते विश्वाची
भ्रमंती क्षणात नभाची
घेऊनी उंच भरारी आकाशी
आनंदाचे तरंग माझ्या उशाशी
क्षणात भेट सागराची
क्षणात सफर निसर्गाची
लाट अंगावर झेलताच
मन बेभान होई
हिरवागार गालीचा पाहुन
मन प्रसन्न होई
पहाटेचा कोंबडा आरवताच
जाग मज येई
रात्रीच्या स्वप्नांची आठवण
मज दिवसभराचा आनंद देई
