मन माझे वेडे
मन माझे वेडे
मन माझे वेडे....
तुझ्यात गुंतले
पण तुला न ते
कधी उमजले
मी कोमेजले
विरहाने तुझिया
वेडीपिसी झाले
सारे लोकही रे
मजवर हसले
मी पुरती फसले
तुझी लग्नपत्रिका
पाहून हादरले
मुळासकट
मी रे कोसळले
मन माझे वेडे
तुझ्यात गुंतले
पण तुला न ते
कधी उमजले
