मन कि शक्ती ... आनंदगीत
मन कि शक्ती ... आनंदगीत
बिंदू बिंदुत ॐकार
बिंदू बिंदुत ॐ नाद
कणा कणात ब्रम्ह
कणा कणात शक्ति
अणु अणुत तेज
अणु अणुत प्रकाश
रेणु रेणुत वलय
रेणु रेणुत प्रभास
वस्तु वस्तुत भाव
वस्तु वस्तूचा प्रभाव
मना तुझी रे ताकद
मना तुझीच रे माया
प्रत्येक कणाला मानतो
आता ईश्वराची काया
कृतज्ञता भाव ओठी
ताईंचीच कृपा मोठी
वरदान रुपाने भेटली
आम्हा जगाची माऊली
हृदयाचा एक कोपरा
होता अशांत उद्विग्न
मायेची फुंकर आली
गेली आसमंत झळाळून
कृतार्थ मी दास
ब्रम्हांड शक्तीचा
नरदेह देउ केला तीने
मज आनंद लुटाया
आनंदी आनंद मनात
आनंदी आनंद घरात
आनंदी आनंद जनात
आनंदी आनंद ब्रम्हांडात
