STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

मन बोलते

मन बोलते

1 min
406

मन बोलते 

मनी झंकारते वीणा होउनि

गत जन्माची ओळख नयनी 

पापणी होते सहजची ओली 

हळव्या क्षणाची आठव लेवुनी 


अबोलीच्या पाकळ्यांचा गंध

गेली सांज एकली मोहरुनी 

बांध मनीचा जणू जातो गगनी 

क्षण साठवणीचे घेते सामवुनी 


रित जुनीच आपुलकी विसरुनी 

वाट तिच भेटाण्या यावी परतुनी

शांत नितळ व्हावा क्षितिज पण 

सांज मोती घ्यावा मनी गोन्दुनी 


क्षणात निवते इथे उदारपण 

क्षणात मिटते सारे दुजेपण 

इवल्याशा आसक्तित ती जाण

तितक्याच उत्कटतेने भेटे संजीवन 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy