मला वेड लागले
मला वेड लागले
मला वेड लागले काव्याचे,
गोड धोड शब्द शोधण्याचे
निर्मिती करून ती पद्याची,
वर्तावी स्थिती ही सध्याची
नका करू कधी अत्याचार,
थांबवा सारेच ते हिंसाचार
करा सन्मान तो माय भगिनींचा,
तव होईल वर्षाव हा शुभेच्छांचा
कळावी ही भाषा सकलांना,
अबाल वॄध्द अन बालकांना
परिवर्तन घडावे असे मनातून,
परिणाम दिसावे कसे जनातून
जसा व्हावा वाल्याचा वाल्मिकी,
अन जागावी माणसातील माणुसकी
मला वेड लागले कसे काव्याचे,
गोड गोड शब्द असे शोधण्याचे
