मला सांग ना
मला सांग ना
मला सांग ना तुला माझं प्रेम कधी कळेल बर ?
सूर आपल्या प्रेमाचा सांग जुळेल का ?
मिळेल का सांग तुझ्यासवे फिरायला ?
हातात हात धरून दिमाखात मिरवायला.
प्रेमाचे नाते जुळले खरे पण,निभावशील का ?
सांग मला तु कायम सोबत करशील का ?
इतका जडला जीव तुझ्यावर आता माघार नाही,
तु मात्र वचन तोडू नको, मज आणखी नको काही.
हृदयात दिली जागा तुला,मलाही मिळेल का ?
माझं हळव मन आणि प्रेम तुला कधी कळेल का ?