मखमली सांजवेळ
मखमली सांजवेळ
मखमली सांजवेळी
तुझा हात हाती आहे
सागराच्या वाळूवरी
मयुराची नक्षी पाहे....
मखमली सांजवेळी
पक्षी घरा परतले
चोचीतुनी चारापाणी
पिलांसाठी आणलेले....
मखमली सांजवेळी
सांज जरा झुकलेली
वसुंधरा वृक्षवेली
सोन किरणात न्हाली....
मखमली सांजवेळी
सांजवात देवापुढे
दिवबत्ती घरादारा
गायगुरे घरापुढे....

